माहिती: अरणगाव येथे पुरातन असलेले हे हेमाडपंथी महादेवाचे अरण्येश्वर मंदीर. मोठ्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच समोर मोठा हेमाडपंथी मंदीराचा सभामंडप नजरेस पडतो. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात उतरुन गेल्यावर महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. दर सोमवारी पूजा व श्रावणात येथे महापूजा करण्यात येते. श्रावणातील तिसरा सोमवारपासून येथे सप्ताह सुरु होतो. त्यादिवशी शेवटच्या दिवशी काल्याचा किर्तनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. शेजारी असलेल्या निस्पृह महाराजांच्या मठातही अनेक भक्तांची मोठी गर्दी असते.
येथे निस्पृह महाराजांची १७ व्या शतकातील संजीवन समाधी असून आता त्या मठात त्यांचे शिष्य राहतात. या ठिकाणी मठ असलेले निस्पृह महाराज (बुवा साहेब महाराज) हे महादेवाची निस्सिम भक्ती करायचे,
सण/उत्सव:
दर वर्षी श्रावण सोमवारी या ठिकाणी भक्तगण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात.
तसेच महाशिवरात्रीला या ठिकाणी महापूजा व मोठा उत्सव साजरा होतो.