श्री विष्णू मंदीराच्या समोरच्या प्रांगणात आपल्याला मोठा बारव बांधलेला दिसून येतो. त्याच्या बाजूला तटबंदी व त्या आत काशी विश्वेश्वराचे मंदिर दिसते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील मोठी पितळी घंटा. अभ्यासक असे सांगतात की अशी घंटा भारतामध्ये फार कमी ठिकाणी सापडते जिचा आवाज कित्येक किलोमीटर पर्यंत ऐकायला येतो. गाभाऱ्यात महादेवाची पिंड नजरेस पडते. या गाभाऱ्यात येण्यासाठी दोन द्वार आहेत. या मंदिराचे निर्माणही अकोबा शेटे यांनीच केले असून मंदिराच्या ठिकाणी त्यांची बैठक व्यवस्था व सिंहासन पहायला मिळते. तिथेच एक भुयारी मार्ग आपल्या नजरेस पडतो. येथील हे भुयार थेट जगदंबा माता मंदीरात निघते असेही सांगण्यात येते.
ही राशीन येथील तिन्ही मंदीरे पेशवेकालीन असून ती श्रीमंत अकोबा शेटे यांनी एकाच कारागीराकडून बांधून घेतल्याचे सांगण्यात येते. तत्कालीन सुंदर स्थापत्य शास्राचा नमुना या मंदिराच्या बांधकामातून आपल्याला पहायला मिळतो. या पेशवेकालीन मंदिराच्या विशिष्ट बांधकाम कौशल्यमुळे तिथे जाणवणारा थंडावा सुखद अनुभव राशीनच्या या वेगळ्या मंदिरात आपल्याला मिळतो.
सण/उत्सव:
दसरा उत्सव
स्थानिक वैशिष्ट्ये:
छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा.
राशीन येथील बाजारात मिळत असलेले पालावरचे रुचकर मटन, पाण्यातील ताजे मासे प्रसिद्ध आहे.
बैल सजावटीचे सामान मिळते.
संपूर्ण राशीनला तटबंदी असून या गावामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत.