Description

स्थळाचे नाव: जवळेश्वर मंदिर, जवळा.

स्थ महात्म्य: दगडी बांधकाम असलेले प्राचीन मंदिर.

ठिकाणाचा प्रकार: मंदिर.

माहिती:

गावात प्रवेश करताच आपल्याला जवळेश्वराचे मंदीर नजरेस पडते. प्राचीन दगडी बांधकाम असलेल्या या मंदीराची रचना ही चौरसाकृती आहे. छोट्या लाकडी द्वारातून प्रवेश केल्यावर आपण या मंदीराच्या प्रांगणात पोहचतो. समोर मोठा सभामंडप असून आत गाभाऱ्यात जवळेश्वराचे म्हणजेच शंकराच्या पिंडीचे दर्शन होते. मंदीराच्या सभोवतालचा परिसर अतिशय शांत व प्रसन्न आहे. मंदीराच्या भोवताली पुष्कळ वृक्ष आपल्याला दिसतात. हे जागृत देवस्थान मानले जाते. गावातच मंदिर असल्यामुळे येथील ग्रामस्थ नित्य नियमाने मंदिराची देखभाल करतात.

 

सण/उत्सव:

  • श्रावणी सोमवार व आषाढी एकादशीला या ठिकाणी भाविक भक्तिभावाने येतात.