Description

स्थळाचे नाव: दुर्योधनाचे मंदिर, दुरगाव

स्थ महात्म्य: देशातील एकमेव असे दुर्योधनाचे मंदिर

ठिकाणाचा प्रकार: मंदिर

माहिती: दुरगाव हे राशीन जवळचे गाव आहे. तेथे देशातील एकमेव असे दुर्योधनाचे मंदिर आहे. पौराणिक काळातील कौरव – पांडवांच्या युद्धाची या गावास पार्श्वभूमी आहे. पांडव अज्ञातवासात होते. ते अज्ञातवासात असताना काही काळ दुरगाव येथे होते असे सांगण्यात येते. पांडवांना कौरवांनी अज्ञातवासात पाठवल्यानंतर ते वनवास भोगत असताना या ठिकाणी आले अशी आख्यायिका सांगण्यात येते. दुरगावात असलेला पांडव डोह अजून याची साक्ष देतो. लोक दुर्योधानाबरोबर पांडव डोहाची पूजा करतात. पावसाळ्यात मंदिरातील दुर्योधनाची मूर्ती कोंडल्यावर मूर्तीला घाम फुटतो व पाऊस पडतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

सण/उत्सव: 

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • राशीन व त्या परिसरातील मंदिरे येथून जवळ आहे.

Photos