स्थळ महात्म्य: हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतिक असलेला दर्गा
ठिकाणाचा प्रकार: दर्गा
माहिती: हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतिक असलेला हा पीर बाबा दर्गा जामखेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. विविध गाव व शहराला जोडणारे रस्ते याच चौकातून जातात. बाजारपेठे जवळ असलेला हा दर्गा पंचक्रोशीतील प्रसिध्द असून अनेक श्रध्दाळू भाविक येथे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येतात. पीर बाबा दर्गा हे असे ठिकाण आहे जिथे नेहमीच हिंदू मुस्लीम ऐक्याचा जागर केला जातो. येथे साजरे होणारे उरुस रमजान ईद या वेळी एकत्र होणारा समुदाय हा एकीच्या भावनेने प्रेरीत झालेले असतो आणि यामुळे संविधानिक धार्मिक समता रुजण्यास मदत होते.
सण/उत्सव: • रमजान ईद
स्थानिक वैशिष्ट्ये: • जवळच अनेक खाद्यपदार्थ्यांची पर्वणी आहे.