Description

स्थळाचे नाव: लोहारदेवी मंदीर, जामखेड

स्थ महात्म्य: ग्रामदेवता, जागृत देवस्थान

ठिकाणाचा प्रकार: मंदिर

माहिती:

गावाच्या वेशीजवळ ग्रामदेवता लोहारदेवीचे मंदीर असून मंदीराच्या सभोवतालचा परिसर अतिशय शांत, सुंदर व प्रसन्न आहे. मंदिराच्या भोवताली पुष्कळ वृक्ष आपल्याला दिसतात. सभामंडप व गाभारा मोठा आहे. आत लोहारदेवीची सुंदर अशी मूर्ती असून सभोवताली प्रशस्त पटांगण आहे. सायंकाळी येथे अनेक भाविक आरतीसाठी जमतात तसेच नवरात्रामध्ये येथे मोठा सोहळा असतो. पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त यावेळी दर्शनासाठी येतात. लोहारदेवीचे हे जागृत देवस्थान मानले जाते. भाविकांच्या मनातील मनोकामना पूर्ण होतात अशी या स्थानाची महती सांगण्यात येते.

सण/उत्सव:

  • नवरात्र उत्सव

Photos