माहिती:
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या बाजूस हे एक प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदीर आहे. तेथील बांधकाम, त्याची बांधकाम शैली प्रेक्षणीय आहे. उंचावर असलेल्या या मंदीरात सभामंडपात मोठी नंदीची आकर्षक मुर्ती असून आतमधील गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. दगडी बांधकाम असल्याने या मंदीराच्या गाभाऱ्यात खूप थंडावा जाणवतो. स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना येथे दिसून येतो.