Description

स्थळाचे नाव: श्री अनखेरी आई मंदीर, धानोरा. 

स्थ महात्म्य: हेमाडपंथी मंदिर.

ठिकाणाचा प्रकार: मंदिर

माहिती:

श्री अनखेरी आई मंदीर हे प्राचीन हेमाडपंथी मंदीर असून या देवस्थानाचे मुळ स्थान माहुर गड आहे. त्याचे बांधकाम १६ व्या शतकातील आहे. श्री अनखेरी देवी ही मुळ माहुर गड निवासिनी रेणुका देवी असून याची एक जुनी कथा सांगण्यात येते. एक व्यापारी या ठिकाणी हिरे माणिक मोती यांचा व्यापार करत असे. एक दिवस देवी एका लहान मुलीच्या रुपात जांभळीच्या झाडाला झोका खेळत होती त्यावेळी देवीने विचारले की, ‘तुम्ही या गोण्या मधून काय चालविले आहे?’ त्यावेळी तो व्यापारी देवीला खोटे बोलला की यामध्ये मीठ आहे. त्यावर तो व्यापारी नदी ओलांडून पुढील गावी गेला. नंतर त्याने आपल्या गोण्या उगडून पहिल्या तर त्यामध्ये हिरे माणिक मोती या ऐवजी मीठ झाले होते. आपली चूक त्या व्यापाऱ्याला लक्षात आली व आपण  खोटे बोलले असून त्याला स्वतः अपराधी असल्याची भावना निर्माण झाली. तो परत आला व त्याने त्या लहान मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेच सापडली नाही. तेथे दोन दगडी पादुका दिसल्या व त्यावर त्याने आपले डोके ठेवले. ‘मी आपले मंदिर बांधून देईल’, असे कबुली दिली व त्यावर देवी प्रगट झाली अशी आख्यायिका सांगितली जाते.

सण/उत्सव:

  • श्री अनखेरी आई देवी मंदीर यात्रा उत्सव चैत्र शुद्ध तृतीया व चतुर्थीला भरतो. यामध्ये देवीची पालखी निघते. अर्धी मंडळी त्यावेळी वाद्य वाजवतात तसेच अनेक जिलह्यातून देवी भक्त देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी यात्रा काळामध्ये देवीच्या दर्शनाला येतात.
  • देवीच्या यात्रेमध्ये कुस्ती आखाडा भरविला जातो. ज्यामध्ये अनेक तालुक्यातून कुस्ती मल्ल येतात.
  • देवीची नवरात्र उत्साहामध्ये गावची यात्रा भरते.
  • तसेच नवरात्रामध्ये हरिनाम सप्ताह भरवला जातो. यामध्ये नामंवत किर्तनकार भजनी मडंळ या ठिकाणी सहभागी होतात व नवमीला देवीचा होम हवन होतो तसेच दशमीला दे‌वीची पालखी निघते. ही पालखी धानोरा गावी प्रस्थान करते व या ठिकाणी रात्रभर देवीची आराधना होते व देवीचा उत्सव साजरा होतो. धानोरा, वंजारवाडी, फक्राबाद पिपंरखेड,आरणगाव, पाटोदा बावी, खाडंवी या जामखेड तालुक्यातील अनेक गावातून लोक सहभागी होतात.

Photos