माहिती:
जामखेड-खर्डा रस्त्यावरुन खर्डा येथे पोहचल्यावर येथून १ किमी अंतरावर संत सीताराम गड आहे. पंचक्रोशीतील भाविकांच्या श्रध्देचे ठिकाण आहे. संत सीताराम बाबांनी जवळपास आजुबाजूच्या १०० गावांमध्ये अध्यात्मिक प्रचार प्रसार केला व अध्यात्माची गोडी त्यांनी लावलेली आहे असे लोक आवर्जून सांगतात. त्यागी, स्वत:च घरसुध्दा नसलेले, अंगी साधेपणा, ब्रह्मचारी चारित्र्य,साधा सात्विक अल्प आहार अशा सत्वगुणांनी युक्त संत सीताराम बाबांचे जीवित कार्य अध्यात्मासोबत दानशूर म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून अनेक शाळा, मठ, देवस्थाने यांना देणग्या दिल्या आहेत.