कर्जत जामखेड पर्यटनाबद्दल​

प्रत्येक प्रादेशिक भागाचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास, परंपरा व जीवनशैली असते आणि हे वेगळेपण तेथील नागरिक वर्षांनुवर्षे ते जपून शाश्वतपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे सगळं हस्तांतरित करत असतात आणि हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

पण हे सगळ जपत असताना या परंपरा, ऐतिहासिक, धार्मिक वास्तू, उत्सव, संस्कृती यांचे कुठेतरी एकत्रित संकलन होऊन जगासमोर हा सुवर्ण ठेवा यायला हवा आणि म्हणूनच कर्जत जामखेड या दोन तालुक्यातील हा अमूल्य ठेवा केवळ त्या भागापुरता मर्यादित न राहता सर्वांसमोर यावा यासाठी मा. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

यामध्ये कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यातील पर्यटन स्थळे, येथील वेगळे वैशिष्ट्ये, खाद्यसंस्कृती, लोककला या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी सर्व लोकांना मिळेल असा आम्ही प्रयत्न केलेला आहे.