कर्जत जामखेड खाद्यसंस्कृती

कर्जत जामखेड खाद्यसंस्कृती बद्दल

जगात निरनिराळ्या पद्धतीची खाद्यसंस्कृती आहे आणि तितकेच खवय्ये आहेत. भारत देश विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक ५०-१०० किमी वर भाषा, संस्कृती, रुढी परंपरा तसेच खाद्यसंस्कृतीही बदलते. पदार्थ तोच पण प्रत्येक भागात त्याची एक वेगळी चव चाखायला मिळते. काही पदार्थ विशिष्ट चवीमुळे त्या भागाचे वैशिष्ट्य ठरतात.

कर्जत जामखेड या दोन तालुक्यात अशीच अनोखी व स्वतःची ओळख निर्माण करणारी खाद्यसंस्कृती आपल्याला पाहायला व खाण्यातून अनुभवायलाही मिळते. अनेक डाळींपासून बनवलेली चवदार शिपी आमटी तर मडक्यात शिजवलेलं लुसलुशीत चिकन आणि मटण…! बरेच शाकाहारी आणि मांसाहारी पाहुणचार हे तर कर्जत जामखेडचे प्रमुख वैशिष्ट्यचं…!

आज अनेक महिलांनी तर बचत गटाच्या माध्यमातून या खाद्यपदार्थांची विविध खाद्य महोत्सवांमध्ये विक्री करुन स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण  केला आहे. भाकरी, पिठलं, ठेचा, खारी पापडी भेळ, चिकन मटणचे प्रकार अशी विविधतेने नटलेली कर्जत जामखेडकरांची ही समृद्ध खाद्य परंपरा आपण एकदा भेट देऊन अनुभवायलाच हवी.