सण आणि उत्सव
सण आणि उत्सव
कर्जत जामखेड येथे सण आणि उत्सव
कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके पर्जन्याच्या दृष्टीने चिंताजनकच…! वरुण राजाची कृपा तशी इकडे कमीच आणि त्यामुळे इथला मुख्य व्यवसाय शेती असला तरी उत्पन्न त्यातून फारसं होत नाही.पण तरीही ही लोक या दुष्काळाशी धीरान लढतात, आणि मुख्य म्हणजे या सर्व रहाटगाड्यात आपल्या परंपरा, सण उत्सव जपतात.
राशिनच्या जगदंबा माता मंदिरातील विजयादशमीचा भाळंद बांधणीचा सोहळा असेल, शेगुडचा खंडोबाचा उत्सव असेल, प्रत्येक एकादशीला होणारे किर्तनं असेल किंवा दर्ग्याचे संदल असेल, हे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरे केले जातात. त्यातून सामाजिक एकोपा राखला जातो. कुस्त्यांसारख्या पारंपारिक खेळांना येथील जत्रांमध्ये मानाचं स्थान असतं. जयंती, पुण्यतिथी, समाधी सोहळा, गावप्रदक्षिणा अशा अनेक परंपरा प्रथा ग्रामस्थ आजही श्रध्देने पाळतात व त्याच पारंपारिक पध्दतीने साजरेही ते करतात.
अशा अनेक सण, उत्सवांची परंपरा जपत कर्जत जामखेडकर आपली संस्कृती जतन करण्याचं काम प्रामाणिकपणे अनेक शतकांपासून करत आहेत.