Description

स्थळाचे नाव: धनेगाव धाकटी पंढरी

स्थ महात्म्य: काही वर्षांपूर्वी बांधलेले हे विठ्ठल रुखमाई यांचे मंदिर असून पंचक्रोशीमध्ये याला धाकटी पंढरी म्हणून मानले जाते

ठिकाणाचा प्रकार: मंदिर

माहिती: एक विठ्ठलभक्त स्री दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीच्या वारीला जायची, परंतु वृध्दावस्थेत थकल्यानंतर तिला जाणे शक्य होत नव्हते अशा वेळी स्वत: त्या भक्ताला पांडुरंगाने दृष्टांत देऊन सांगितले की, ‘तुला पंढरीस येण्याची गरज नाही मीच धनेगाव येथे आलेलो आहे’, अशी अख्यायिका धनेगाव येथील मध्यभागी असलेल्या या मंदिराच्या निर्मितीची सांगण्यात येते. या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे जवळील डोहात शोधले असता तिथे स्वयंभू विठोबा रुखमाईच्या मूर्त्या सापडल्या व ग्रामस्थांनी याच मूर्त्यांची स्थापना या मंदिरात केली.

मंदिराची रचना-

पूर्वी हे मंदिर म्हणजे १० खणाची इमारत होती परंतु नंतर भक्तांच्या सहकार्यातून या मंदिराचे बांधकाम २ सभामंडप व मुख्य गाभारा असे करण्यात आले. याच मंदिराला लागून मोठे मैदान आहे.

 

सण/उत्सव:

  • आषाढी व कार्तीकी एकादशीला येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.
  • प्रत्येक एकादशीला इथे कीर्तन संपन्न होते.

 

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • शेजारी हनुमान मंदिर आहे.
  • जवळच एक दर्गा आहे.

Photos