Description

स्थळाचे नाव: नागेश्वर मंदिर, जामखेड

ठिकाणाचा प्रकार: हेमाडपंथी मंदिर

माहिती: नदीच्या तीरावर असलेल्या ३५ × ७० फूट जागेत या हेमाडपंथी मंदीरातील महादेवाचे लिंग हे स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी भगवान शंकराचे निस्सिम भक्त असलेल्या काही साधू महात्मे व ऋषी मुनींचे वास्तव्य होते. त्यांचे देखील मंदिर या नागेश्वर मंदिराजवळ आहे. तसेच मंदिरासमोर त्या ऋषीमुनींच्या समाध्या देखील बांधण्यात आलेल्या आहेत.
नागेश्वराच्या मंदिरामध्ये कमानीतून प्रवेश करताच अखंड दगडातून साकारलेल्या व उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेल्या नंदीच्या मूर्तीचे दर्शन होते. त्यानंतर आपल्याला ८ ते ९ दगडी खांब दिसतात व पुढे गाभाऱ्यात प्रवेश करुन महादेवाचे दर्शन घेता येते. संपूर्ण मंदिर हे दगडी असून येथे बरीच झाडे आहेत त्यामुळे या परिसरात सकाळी व सायंकाळी अगदी शांत वाटतं.

सण/उत्सव:

  • श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व विशेषतः तिसऱ्या सोमवारी येथे भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.
  • तसेच या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी गावयात्रा भरते.
  • यामध्ये लेझीम सारख्या ग्रामीण खेळ व अनेक लोककलाही सादर होतात.

स्थानिक वैशिष्ट्ये:
• तालुक्याचे ठिकाण जामखेड फार जवळ आहे.

Photos