माहिती : जवळा येथे नदीच्या किनाऱ्याजवळ अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात हा ७०० वर्ष जुना हा दर्गा आहे. पूर्वी या दर्ग्याचे बांधकाम संपूर्ण दगडी होते परंतु आता काही वर्षांपूर्वी त्यात बाहेरील बाजूने नविन बांधकाम केलेले आढळते. दर्ग्याची आतील बाजू जिथे चादर चढवली जाते त्यामधील आतला घुमट हा पुर्णपणे काचेचा असुन दर्ग्याच्या सभोवती चार मिनार बांधलेले आहेत.
फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या दरम्यान येथे मोठा उरुस भरतो, ज्यामध्ये सर्वधर्मीय नागरीक सहभागी होतात. या ठिकाणी होणारा कव्वालीचा कार्यक्रम पंचक्रोशीत प्रसिद्ध असून दर गुरुवारी भरणाऱ्या पीर बाबा दरबारालाही भक्तजणांची हजेरी मोठ्या प्रमाणावर असते. गेल्या सात शतकांपासून हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतिक असणारा हा जवळा येथील प्राचीन दर्गा या सर्वधर्मसमभावाची प्रेरणा देत आजही भक्कमपणे उभा आहे.