Description

स्थळाचे नाव: श्री विष्णू मंदिर, राशीन

 

स्थ महात्म्य: भारतातील श्री विष्णूंच्या दुर्मिळ काही मंदिरांपैकी एक

 

ठिकाणाचा प्रकार: मंदिर

माहिती:

राशीन गावाच्या वेशीच्या जवळ असलेले व भारतातील श्री विष्णूंच्या दुर्मिळ मंदिरांपैकी एक असलेले विष्णू मंदिर. प्रांगणामध्ये भव्य आकर्षक अशा भगवान विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडाची मूर्ती पाहायला मिळते. आत सभामंडपात प्रवेश करताच आपल्याला सुंदर असे दगडी खांब नजरेस पडतात. लगतच विठ्ठल रुखुमाई आणि गणपतीची मूर्ती नजरेस पडते. या मंदीराच्या सभोवताली दगडी तटबंदी असून मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत.

 

सण/उत्सव:

  • दसरा उत्सव

 

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा.
  • राशीन येथील बाजारात मिळत असलेले पालावरचे रुचकर मटन, पाण्यातील ताजे मासे प्रसिद्ध आहे.
  • बैल सजावटीचे सामान मिळते.
  • संपूर्ण राशीनला तटबंदी असून या गावामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत.