Description

स्थळाचे नाव: संत गीते बाबा समाधी, खर्डा

स्थ महात्म्य: महाराष्ट्रातील बीड येथील प्रसिद्ध अशा संत भगवान बाबा यांचे गुरु असलेल्या संत गीते बाबा या सत्पुरुषाची समाधी.

ठिकाणाचा प्रकार: समाधी

माहिती: पंढरीच्या विठ्ठलाचे परमभक्त असलेले संत गीते बाबा आपल्या निस्पृह व त्यागी वृत्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांचे मूळ गाव दिघोळ होते व ते दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जायचे. एकदा त्यांच्या शेतात त्यांना साक्षात विठ्ठलाने दर्शन दिले असे सांगण्यात येते. खर्डा या ठिकाणाजवळ त्यांचा मृत्यू घोड्यावरुन जात असताना झाला. भक्ती आणि समाज जागृतीचे काम करत असणाऱ्या संत गीते बाबांची या ठिकाणी समाधी बांधण्यात आली. समाधीच्या ठिकाणी मंदीर बांधण्यात आले असून या संपूर्ण मंदिराला संरक्षक भिंत आहे. ५ एकराचा परिसर हा भाविक भक्तांच्या गर्दीने नेहमीच गजबजलेला असतो.

सण/उत्सव:

  • भगवान बाबांची दिंडी या ठिकाणी थांबते तेव्हा अनेक भाविक पालखीच्या दर्शनासाठी येथे येतात
  • संत गीते बाबांचा जयंती सोहळा व समाधी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होता तेव्हा अनेक भाविक उपस्थित असतात
  • तसेच पिघोळवरुन पंढरपूरला दरवर्षी पालखी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाते

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • बस स्टॉप जवळ मिळणारी गोड पापडी शेव शेंगदाणा खायला खूप कुरकुरीत व स्वादिष्ट लागते. या पापडीस जिल्हाभरातून प्रचंड मागणी असून खवय्यांची विशेष पसंती या पापडीस मिळते आहे.

 

Photos