Description

स्थळाचे नाव: संत सावता माळी मंदिर, आंबीजळगाव

स्थ महात्म्य: वारकरी सांप्रदायाचे महत्वाचेठिकाण

ठिकाणाचा प्रकार: संत मंदिर

माहिती: संत सावता माळी महाराजांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भाडभीड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. त्यांचे काही प्रसिध्द अभंग:

  • ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’
  • ‘कांदा मुळा भाजी अवघी | विठाबाई माझी’
  • ‘लसूण मिरची कोथिंबीर| अवघा झाला माझा हरि ||’
  • ‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
    तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।‘

हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला.

१६-१७ वर्षांपूर्वी अंबीजळगाव येथील ग्रामस्थांनी हे मंदिर लोकवर्गणीतून उभारले. संत सावता माळी हे वारकरी सांप्रदायातील अग्रणी असून त्यांचे साहित्य हे सांप्रदायात महत्वाचे मानले जाते. याठिकाणी मंदिरात संत सावता माळी व विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती. गाभाऱ्याच्या समोरील भव्य सभा मंडपात भजन, कीर्तन, पारंपारिक व तसेच समाजोपयोगी कार्यक्रम होतात.

सण/उत्सव:

  • पवित्र आषाढ महिन्यात या ठिकाणी मोठा कीर्तन सप्ताह पार पडतो
  • तसेच रोज संध्याकाळी ग्रामस्थ येथे भजनाची सेवा सादर करतात