Description

स्थळाचे नाव: जगदंबा माता मंदीर, राशीन

स्थ महात्म्य: हेमाडपंथी मंदिर

ठिकाणाचा प्रकार: मंदिर

माहिती:

जगदंबा माता मंदिर हे हेमाडपंथी मंदिर स्वयंभू देवस्थान असून याचा जिर्णोध्दार सन १७०४ ते १७१० या काळात अकोबा शेठे यांनी केला. या मंदिराला भव्य दगडी तटबंदी बांधली. मंदिराला भव्य प्रवेशद्वार असून हलत्या दिपमाळा प्रांगणात दिसतात. सभोवताली तटबंदीच्या आतील बाजूस असलेल्या ओवऱ्या व त्यामधील मुर्त्या लक्षवेधक ठरतात. त्यावर नक्षीकाम हे खूप आकर्षक व सुंदर आहे. सभामंडपाच्या समोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. मुख्य दगडी सभामंडपाच्या पाठीमागील ओवऱ्यांमध्ये ४ शिलालेखही आढळतात

जगदंबा माताची मूर्ती खूप बोलकी असून आपण त्यावरुन नजर हटवू शकत नाही. दर्शन घेऊन नक्कीच सर्वांना अतिशय प्रसन्न वाटतं. या मंदीराचे विशेष म्हणजे सभामंडपाच्या बाहेर असलेल्या हलत्या दिपमाळा व तटबंदीच्या आतील बाजूस असलेल्या जवळपास १०० ओवऱ्या आहेत त्यावर असलेल्या फुलांचे नक्षीकाम हे बारकाईने पाहिले असता असे दिसते की सगळी फुल वरवर सारखी दिसत असली तरी कारागिरांनी त्यामध्ये बारकाव्यांनी नक्षीकाम करुन प्रत्येकाचे वेगळेपण दाखवलं आहे.

सण/उत्सव:

  • नवरात्रीचा व विजयादशमीचा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी पार पडतो
  • कोजागिरीला भळंद बांधले जाते (परंपरेप्रमाणे चालत आलेली ही राशीनची एक प्रथा आहे) 

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा.
  • राशीन येथील बाजारात मिळत असलेले पालावरचे रुचकर मटन, पाण्यातील ताजे मासे प्रसिद्ध आहे.
  • बैल सजावटीचे सामान मिळते.
  • संपूर्ण राशीनला तटबंदी असून या गावामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत.