माहिती: एक विठ्ठलभक्त स्री दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीच्या वारीला जायची, परंतु वृध्दावस्थेत थकल्यानंतर तिला जाणे शक्य होत नव्हते अशा वेळी स्वत: त्या भक्ताला पांडुरंगाने दृष्टांत देऊन सांगितले की, ‘तुला पंढरीस येण्याची गरज नाही मीच धनेगाव येथे आलेलो आहे’, अशी अख्यायिका धनेगाव येथील मध्यभागी असलेल्या या मंदिराच्या निर्मितीची सांगण्यात येते. या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे जवळील डोहात शोधले असता तिथे स्वयंभू विठोबा रुखमाईच्या मूर्त्या सापडल्या व ग्रामस्थांनी याच मूर्त्यांची स्थापना या मंदिरात केली.