स्थळाचे नाव: श्रीमंत अकोबा स्वामी भुजंग अय्या शेटे समाधी, राशीन.
स्थळ महात्म्य: संजीवन समाधी
ठिकाणाचा प्रकार: समाधी मंदिर
माहिती:
राशीन येथे या तिन्ही मंदिराचे बांधकाम ज्या श्रीमंत अकोबा स्वामी शेटे यांनी केले त्यांचीही समाधी या ठिकाणी काशी विश्वेश्वराच्या मंदीराच्या बाजूला आहे. श्रीमंत अकोबा स्वामी शेटे यांनी या मंदीराचे बांधकाम एकाच कारागीराकडून बांधून घेतल्याची नोंद आहे. श्रीमंत अकोबा स्वामी शेटे यांच्याबद्दल असेही सांगण्यात येते की, त्याकाळी त्यांनी येथून पेशव्यांना पैसे स्वरुपात मदत केली होती. त्यांच्या दानशुरपणाच्या व भक्तीच्या अनेक गोष्टी आजही पंचक्रोशीतील ग्रामस्थ सांगतात. मीठाचे मोठे व्यापारी असलेले अकोबा शेटे यांना एकदा देवीचा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी या तिनही मंदीराचे बांधकाम मोठ्या श्रध्देने करुन घेतले. अकोबा शेटे यांना जगदंबा कृपेने कधीही या बांधकामासाठी धन कमी पडले नाही. असे सांगण्यात येते की हे बांधकाम साक्षात जगदंबेने त्यांच्याकडून करुन घेतले.
सण/उत्सव:
आषाढ वद्य एकादशी पुण्यतिथी सोहळा
स्थानिक वैशिष्ट्ये:
छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा.
राशीन येथील बाजारात मिळत असलेले पालावरचे रुचकर मटन, पाण्यातील ताजे मासे प्रसिद्ध आहे.
बैल सजावटीचे सामान मिळते.
संपूर्ण राशीनला तटबंदी असून या गावामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत.