Description

स्थळाचे नाव: संत सीताराम गड, खर्डा

स्थ महात्म्य: महत्वाचे सांप्रदायिक ठिकाण

ठिकाणाचा प्रकार: समाधी व गड

माहिती:

जामखेड-खर्डा रस्त्यावरुन खर्डा येथे पोहचल्यावर येथून १ किमी अंतरावर संत सीताराम गड आहे. पंचक्रोशीतील भाविकांच्या श्रध्देचे ठिकाण आहे. संत सीताराम बाबांनी जवळपास आजुबाजूच्या १०० गावांमध्ये अध्यात्मिक प्रचार प्रसार केला व अध्यात्माची गोडी त्यांनी लावलेली आहे असे लोक आवर्जून सांगतात. त्यागी, स्वत:च घरसुध्दा नसलेले, अंगी साधेपणा, ब्रह्मचारी चारित्र्य,साधा सात्विक अल्प आहार अशा सत्वगुणांनी युक्त संत सीताराम बाबांचे जीवित कार्य अध्यात्मासोबत दानशूर म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून अनेक शाळा, मठ, देवस्थाने यांना देणग्या दिल्या आहेत.

समाधी मंदीर संत सीताराम बाबा जीवंत असतानाच त्यांनी ह्या गडाचे बांधकाम करुन घेतले होते. २०१३ साली बाबांच्या देहांतानंतर त्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली. ५ एकराचा हा संपूर्ण परिसर सभामंडप, मुख्य समाधी मंदिर व त्याचबरोबर विविध सामाजिक कामांसाठी सभागृह देखील बांधण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगड हा कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मागवण्यात आला होता.

 

सण/उत्सव:

  • परिसरातील हे सगळ्यात मोठे तिर्थक्षेत्र असून एकादशीचा मोठा उत्सव येथे करण्यात येतो
  • सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बाबांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला काल्याचे किर्तन होते. त्यावेळी जवळपास ५० हजारापर्यंत भाविकांची गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी असते.

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • बस स्टॉप जवळ मिळणारी गोड पापडी शेव शेंगदाणा खायला खूप कुरकुरीत व स्वादिष्ट लागते. या पापडीस जिल्हाभरातून प्रचंड मागणी असून खवय्यांची विशेष पसंती मिळते.

Photos