Description

स्थळाचे नाव: नंदादेवी मंदीर, नान्नज.

स्थ महात्म्य: नान्नज येथील नंदादेवीचे मंदिर हे ग्रामदैवत आहे.

ठिकाणाचा प्रकार: मंदिर.

माहिती: चौंडीवरुन जामखेड रस्त्याकडे येत असताना नान्नज हे गाव लागते. या ठिकाणी गावाच्या उत्तरेस असलेल्या एका उंच डोंगरमाथ्यावर नंदादेवीचे  मंदीर असून हे नान्नज येथील ग्रामदैवत मानले जाते. नान्नज गावाच्या शेवटी एका छोट्या टेकडीवर हे स्थान असून पायथ्यापासून वर जवळपास ३० पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला मंदिराचा शांत सभामंडप समोर दिसतो व गाभाऱ्यात नंदादेवीचे दर्शन घेता येते. याच मंदिरच्या उजव्या बाजूस एक मोठे तळे असून येथे पावसाळ्यात कमळं पहायला मिळतात. मंदिराचा सभोवतालचा परिसर हा वृक्षांनी वेढलेला असून वातावरण शांत व नयनरम्य आहे. नवरात्रामध्ये येथे अनेक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. भक्तांच्या श्रध्देला पावणारी देवी म्हणून नंदादेवी मंदिराची पंचक्रोशीत ख्याती आहे.

सण/उत्सव:

  • नवरात्र उत्सव

Photos