काय आहे कर्जत जामखेड मध्ये
कर्जत जामखेड मध्ये पहाण्यासारख्या सर्वोत्तम गोष्टी, मंदिर, वन्यजीव, किल्ला आणि बरेच काही शोधा
कर्जत
जामखेड
बद्दल
प्रत्येक प्रादेशीक भागाचा आपला स्वतंत्र असा एक ईतिहास असतो,परंपरा असतात,जीवनशैली असते आणि हे वेगळेपण तिथले नागरीक वर्षानुवर्षे ते जपुन शाश्वतपणे एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे हे सग़़ळं हस्तांतरित करत असतात.
पण हे सगळ जपत असतांना या परंपरा, ऐतिहासिक , धार्मिक वास्तु, उस्तव, संस्कृती यांच कुठेतरी एकत्रीत संकलन होऊन जगासमोर हा सुवर्ण ठेवा यायला हवा.आणि म्हणूनच कर्जत जामखेड मधील हा अमुल्य ठेवा केवळ त्या भागापुरता मर्यादित न राहता सर्वांसमोर यावा यासाठी मा. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे.
ज्यामध्ये कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे,धार्मिक स्थळे,प्रेक्षणीय स्थळे,ईथले वेगळे वैशिष्ट्ये,ईथली खाद्यसंस्कृती,लोककला या सर्वांची माहीती एकाच ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’ च्या माध्यमातून कर्जत-जामखेड येथे नागरिक, स्वयंसेवक, राज्य सरकार; तसेच खासगी कंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. संस्थेकडून विकासात्मक पावले उचलताना शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, महिला सक्षमीकरण; तसेच पर्यटन या क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये पहिल्यांदा पर्यटनावर काम सुरू करत असून पर्यटनाला चालना दिल्यास स्थानिक युवक, महिला यांच्या विकासाला गती मिळू शकेल व नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड हा एक ‘ब्रँड’ बनेल असा विश्वास वाटतो.
आमदार, विधानसभा महाराष्ट्र
चला अनुभवूया कर्जत जामखेड
मतदारसंघातील विविध पर्यटनस्थळे पहा
दुर्योधनाचे मंदिर, दुरगाव
विठ्ठल रुखमाई मंदिर, धाकटी पंढरी, धनेगाव
संत गीते बाबा समाधी, खर्डा
श्री विष्णू मंदिर, राशीन
श्री महासती अक्काबाई मंदिर, कर्जत
सद्गुरु गोदड महाराज मंदीर, कर्जत
श्री सिध्दीविनायक मंदिर सिद्धटेक
रेहेकुरी काळवीट अभयारण्य
खर्डा भुईकोट
देणगी व मदत
चला एकत्रित येऊन कर्जत जामखेड मतदारसंघातील महिला सक्षमीकरण, शैक्षणिक, आरोग्य व पाणी प्रश्न देणगी देऊन सोडवूया आणि शाश्वत विकासासाठी हातभार लावूया.