Blog

February 14, 2020 0 Comments

पर्यावरणप्रेमी आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते – पोपटराव खोसे,मलठण

कर्जत-गाव पाणीदार राहण्यासाठी गावाच्या एकमुखी निर्णयातून वाळू उपसा बंद ठेवल्याने आजच्या परिस्थितही पाण्याची भूजलपातळी तग धरून आहे.
कर्जत तालुक्यातील मलठण गावाने १९७८साला पासून सिना नदी पात्रातील वाळू उपसा बंद ठेवल्याने गावात आजही भूजल पातळी चांगली आहे.भविष्यातील दुष्काळी परिस्थितिला तोंड देण्यासाठी या गावाचा उपक्रम आजही गांव पातळीवर टिकून आहे.

या बाबत गावातील पर्यावरणप्रेमी आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव खोसे,अड़.माणिकराव मोरे,माजी सभापती अप्पासाहेब भिसे,भिवा आण्णा भिसे,डॉ.सुरेश भिसे आणि तात्कालीन गावातील पदाधिकारी यांनी गावातील ग्रामस्थांना एकत्र करून ही संकल्पना मांडली.आणि गावाचा एकमुखी निर्णय झाला.आणि गावाची पाण्याची पातळी आजही चांगली आहे.पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही कमी अधिक पाणी उपलब्ध आहे.
यावेळी लोकमतशी बोलताना पोपटराव खोसे म्हणाले की,वाळू हे जमिनीत स्पंज म्हणुन पाणी शोषून ठेवते.यामुळे भूगर्भातील पाणी पातळी उत्तोतर वाढत जाते.यामुळे इंधन विहिरीचे पाणी दीर्घकाळ टिकून राहते.तसेच गांव आणि शिवारातील खाजगी विहिरींची पाणी पातळी टिकल्याने शेती पिकांसह शेती पूरक व्यावसायालाही चालना मिळाली

पर्यावरणाच्यादृष्टीने आजही गावात जैविक संपदा टिकून आहे.औद्योगिकरणामुळे आज बेसुमार वृक्षतोड़ होत आहे.यामुळे प्राणी पक्षी लोप पावत चालले आहे.आम्ही गावात वृक्षसंवर्धना बरोबर पक्ष्याची कृत्रिम घरटी तयार केली आहे.नैसर्गिक वातावर्णामुळे पक्षी आणि प्राण्यांची प्रजनन क्षमता वाढते आणि गावात आणि सभोवताली नैसर्गिक वातावरणामुळे पक्षी आणि प्राण्यांचा वावर आहे.यामुळे गावालाही याचा लळा लागला आहे.
यागावात आजही राजकीय,आणि जातीय सलोखा अबाधित असल्याने समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा विधायक कामात नेहमी सहभाग असतो.आनंदाची बाब म्हणजे लवकरच मलठण हे गाव जैविक शेतीकड़े वळण्याच्या मार्गावर आहे.
चौकट:-वाळू उपसा सुरु व्हावा यासाठी अनेक प्रलोभन दखविण्यात आले.विरोध कायम ठेवल्याने धमक्या आल्या परंतु गांव पाठीशी असल्याने डगमगलो नाही.
-पोपटराव खोसे,सामाजिक कार्यकर्ते,मलठण
सदर फोटो ड्रोनद्वारे गेल्या मे महिन्यात काढलेले आहे.